चालू घडामोडी 31 डिसेंबर 2025

आज 31 डिसेंबर आहे आणि आपणास ठाऊक आहे 31 डिसेंबर म्हणजे 2025 ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे म्हणून आज आपण सर्वांनी मिळून एक शपथ घ्यायची आहे कि ह्या वर्षी मी माझी पूर्ण ताकत लावेल आणि एक सरकारी नौकरी नक्कीच मिळवेल आणि त्याचा शपतीने आपला अभ्यास जोराने चालू ठेवायचा आहे. आज 31 डिसेंबर आहे म्हणून आपणास मित्रांनी बोलावलेल्या ठिकाणी मेजवानी साठी जावू नका तर आपण सर्वांनी आपला अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे एकदा हातात सरकारी नौकरी आली कि मग किती हि मेजवानी करा आपल्या मित्रांना मेजवानी द्या मग आपणाला कोणी काहीच बोलणार नाही मग ते दिवस तुमचे असतील फक्त आता त्याग करा म्हणजे तुम्हाला तुमचा चांगला निकाल भेटेल.

नवीन वर्षाचा शेवटचा दिवस असला तरी मात्र आपल्या स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अनिवार्य आहे ज्या दिवसी आपला निकाल लागेल तो आपला नवीन वर्ष असेल हे आपण आता लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. संपूर्ण वर्षभरात झालेल्या चालू घडामोडीची मी लवकरच परीक्षा घेवून येत आहे आपण सर्वांनी तयारीत राहायचा आहे. आता आपल्याला ह्या वर्षात झालेल्या कोणत्या घडामोडी लक्षात ठेवायच्या आहेत त्याचे विषय मी पुढे देत आहे त्या गोष्टी लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. अपेक्षित विषय देशातील आणि परदेशातील घडलेल्या राजकीय घडामोडी, शैक्षणिक, महत्वाच्या सामाजिक, अर्थव्यवस्था, क्रीडा व वैज्ञानिक आणि तंत्राद्यानात झालेले बदल ह्या क्षेत्रातील घटनांचा आयोग आपल्याला प्रश्न विचारात असतो म्हणून हे महत्वाचे विषयांना धरून आपण आपला अभ्यास नियमित ठेवायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा आपण अभ्यास किती करता हे देखील महत्वाचे आहे आणि त्याच अभ्यासाची किती उजळणी करता हे जास्त महत्वाचे आहे म्हणून उजळणी जास्त मजबूत ठेवा, त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षा मध्ये मोठा होणार आहे. 

आर्थिक क्षेत्रातही देखील मोठे बदल दिसून येतात. महागाई दर किती वाढला, व्याजदराचे प्रमाण, बँक चे नियमात देखील बदल होत असतात, शेयर बाजार देखील महत्वाचा विषय आहे. अर्थसंकल्पामध्ये देखील नवीन आर्थिक धोरणे स्वीकारली जातात त्याची पूर्वतयारी ह्या बाबी देखील चालू घडामोडी मध्ये महत्वाच्या आहेत. आर्थिक वाढेचा दर, नवीन आर्थिक सुधारणा या विषयावर आधारित खूप प्रश्न आयोगाने पूर्वी विचारले आहेत म्हणून ह्या विषयांना देखील महत्व देणे अपेक्षित आहे.

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे विजयवाडा येथे झालेल्या 87 व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिवांची 5 वी राष्ट्रीय परिषद, 2029 च्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेच्या आठ स्पर्धा, पार्वती-अर्गा पक्षी अभयारण्य, 1 जानेवारी 2026 पासून भारतीय निर्यातीसाठी 100 टक्के टॅरिफ लाईन्सवरील सीमाशुल्क रद्द करण्याची घोषणा, भारतीय तटरक्षक दलाने प्रादेशिक प्रदूषण प्रतिसाद व्यायाम (RPREX-2025) आयोजले, 72 व्या वर्षी निधन झालेले के.शेखर, राज्य सरकारने अलीकडेच 'ई-आरोग्य संवाद' नावाचा एक नवीन डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सुरू केला इत्यादी महत्वाच्या ठळक बाबी आहेत तर ह्या बाबी आपण सर्वांनी परीक्षेला जात असताना लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test