मराठी व्याकरण अतिम्हत्वाचा विषय आहे स्पर्धा परीक्षेसाठी आणि आपल्याला ह्याचा अभ्यास आणि सराव जास्त करायला पाहिजे कारण मराठी व्याकरण मध्ये खूप जास्त प्रश्न चुकवले जात आहेत मी काल परीक्षा देत असताना खूप प्रश्न चुकलो आणि त्यामुळे मराठी व्याकरण चांगला करणे आवश्यक आहे आणि आपली राजभाषा मराठी आहे आणि आपले व्याकरण कच्चे असणार तर कस चालणार आहे.
महाराष्ट्राची राजभाषा म्हणजेच मराठी आणि मराठीचा अभ्यास करताना व्याकरण सर्वात जास्त महत्वाचे आहेत आपण बोलताना अनेक चुका करत असतो. भाषा केवळ सवांद साठी न्हवे तर आपली परंपरा, आपली जुन्यापासून आलेली संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलेली आपली भाषा म्हणजे मराठी भाषा होय आणि आता आपण स्पर्धा परीक्षेचे दृष्टीने अभ्यास करत असताना व्याकरणाला मोठे महत्व आहे हे महत्व लक्षात घेवून आपण व्याकरणाचा चांगला अभ्यास करणे अनिवार्य आहे. आपण भविष्यात सरकारी कार्यालयात काम करणार आहेत मग त्याठिकाणी आपल्याला मराठी भाषेचे चांगले ज्ञान अवगत असणे काळाची गरज आहे कारण महाराष्ट्रात काम करायचे असेल तर नागरिकांसोबत मराठी भाषेत सवांद साधने अपेक्षित आहे आणि त्यामुळेच आयोगाला व्याकरणीदृष्ट्या होणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना मराठी व्याकरणाचे महत्व पटवण्यासाठी स्पर्धा परीक्षांना मराठी व्याकरण महत्वाचे केले गेले आहे.
व्याकरणात स्वर, वंजन, सर्वनाम, क्रियापद आणि संज्ञा असे अनेक महत्वाचे घटक आहे फक्त एवढेच न्हवे तर या व्यतिरिक्त देखील महत्वाचे घटकांचा अभ्यास आपल्याला करायला लागतो. मराठी व्याकरणाचे चांगले अध्ययन केल्यास त्यात शब्दाचे रूप, वचन, लिंग आणि काळ यासारख्या महत्वाच्या गोष्टी स्पष्ट होण्यास चांगली मदत होते आणि या व्याकरणामुळे आणि ह्या लहान लहान गोष्टीमुले निबंध, कादंबरी, लेख, कविता या गोष्टीची रचन आपण सहजपणे आणि चांगल्या वजन शब्दात मांडू शकतो.
