मराठी व्याकरण महत्वाचा विषय आहे आणि आपल्या प्रत्येकाला ह्या विषयाचे महत्व पटलेले आहेच पण तरी आपण जर मराठी व्याकरण विषयाचा अभ्यास चांगला केला पाहिजे करा ह्या विषयासाठी तब्बल आपल्याला 25 प्रश्न विचारले जातात आणि हे गुण आपले हातचे असतात. मराठी विषयात आपण प्रत्येकाला 25 पैकी 25 गुण पडलेच पाहिजे आणि त्यासाठी हा माझा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे आपल्यासाठी MCQ परीक्षा उपलब्ध करून देणे. मराठी व्याकरणावर मी ज्या परीक्षा तुमच्यासाठी घेवून येत आहेत ते प्रश्न जसेच्या तसे परीक्षेला विचारले गेले आहेत म्हणून याचा आधार घेवून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे कि आपण चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे बघा आणि 2-3 वेळा एक परीक्षा द्या म्हणजे तुमचे व्याकरण सुधारेल आणि याचा फायदा तुम्हाला परीक्षेत नक्कीच होयील.
मराठी भाषा हि केवळ भाषा नसून मराठी लोकांसाठी भावना आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मराठी व्याकरण हे महत्वाचे आहे हि फक्त भाषा नाही तर राजकीय भाषा म्हणून सरकारी कार्यालयात वापरली जाते म्हणून मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक मानले गेले आहे. पोलीस शिक्षण आणि इतर शासन परीक्षेमध्ये मराठी विषयाची चाचणी आणि भाषेचे ज्ञान आवश्यक मानले जाते. मराठी भाषेचे व्याकरणाचे काम फक्त परीक्षेपुरते मर्यादित असता कामा नये तर आपल्या लेखनात, वाचनात आणि समाजात जनजागृती साठी देखील महत्वाचे ठरले आहे. महाराष्ट्रतात आपण आपली भाषा मराठी आहे आणि स्पर्धा परीक्षेचे उमेदवार आहेत ह्या अनुषंगाने आपल्याला मराठी भाषा व्याकरणासहित योग्यप्रकारे माहिती असणे अपेक्षित आहे. मराठी भाषेचा फक्त गर्व करून चालणार नाही तर आपल्याला भाषा जपायला पाहिजे आपल्याला सगळ्याच भाषांचा आदर करायला पाहिजे आणि महाराष्ट्राचे रहिवासी ह्या अनुषंगाने तर आपल्याला मराठी भाषा चांगल्याप्रकारे अवगत असणे अपेक्षित आहे.
