मराठी व्याकरण तयारीसाठी MCQ सराव परीक्षा 04

मराठी व्याकरण विषयाच्या परीक्षेसाठी आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मागील वर्षाला आलेल्या प्रश्नांचा सराव पेपर आज आपण घेत आहे तर आपण सर्वांनी लक्ष देवून हा पेपर सोडवायचा आहे तुम्हाला ह्या पेपर चा विशेष फायदा परीक्षेला होणार आहे म्हणून आपण सर्वांनी लक्ष देवून हा पेपर सोडवायचा आहे. आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम माहिती आहे आणि ह्या अभ्यासक्रमात महत्वाच्या विषयाचा पुढे मी थोडक्यात माहिती देत आहे तर ह्या पेपर मध्ये तुम्हाला संधी, समास, अलंकार, काळ, वाक्यप्रकार, शब्दशुद्धी, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, म्हणी-वाक्प्रचार इत्यादी विषयावर बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि तुम्हाला मराठी व्याकरण ह्या विषयात याच विषयावर अभ्यास चालू ठेवायचा आहे तरच तुम्हाला नेमका आणि चांगला अभ्यास होवून परीक्षेला चांगला फायदा होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा अभ्यास फक्त परीक्षेपुरता मर्यादित ठेवू नका तर मराठी भाषा आपली राजभाषा आहे त्या भाषेला चांगला आधार आणि आदर द्या आणि चांगला वापर करा. आपली मराठी व्याकरण ची व्याप्ती वाढवा आणि परीक्षेपुरता न ठेवता दैदंदिन कामकाजात देखील मराठी भाषेला चांगला दर्जा द्या.

मराठी विषयाचा सखोल अभ्यास आयोगाला अपेक्षित आहे आणि आपली राजभाषा आपल्याला नित व्याकरणासहित माहिती असणे आपली शान आहे. आपली मराठी भाषा राज्याशी आणि सामाजिक नाते जोडते. स्पर्धा परीक्षेत आपण सर्वांनी यश परिधान करून सरकारी नौकरी मिळवून आपण प्रभावी आणि आत्मविश्वासी व्हायचं आहे त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेची शान कायम ठेवायची आहे आणि यासाठी आयोगाला अपेक्षा आहे कि आपलं आपल्या मराठी भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post