मराठी व्याकरण तयारीसाठी MCQ सराव परीक्षा 05

आपल्या सर्वाना माहिती आहे व्याकरण मराठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अत्यंत महत्वाचा विषय आहे. आयोग आपल्याला अनेक लहान मोठे प्रश्न सोपे कठीण प्रश्न आपल्याला करत असतो. आयोगाचे प्रश्नांना मजबुतीने तोंड देण्यासाठी आपण इथे चालू घडामोडी, रोजच्या अनेक विषयावर परीक्षा, तसेच मराठी व्याकरण आणि तोंडी परीक्षा असे अनेक प्रकारचे प्रश्न आपण इथे रोज देत असतो आणि तुम्हाला नकीच परीक्षेला ह्याचा फायदा होणार आहे. 

मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना आपल्या नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय, केवळप्रयोगी अव्यय विषयाचा प्रथम अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे हे मुख्य शब्दांचे प्रकार येतात. प्रत्येक शब्द्प्रकाराचा योग्य वापर केल्या आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवता येते ज्याचा अर्थ स्पष्ट आणि प्रभावी असतो. क्रियापद मुख्य आहे कोणतेहि वाक्य पूर्ण करायचे म्हटल्यास क्रियापद लागतेच क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही आणि विशेषणामुले वाक्यात स्पष्टता येते म्हणून कोणते हि वाक्य तयार करायच्या म्हटल्यास सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत. प्रत्येक शब्दाच्या प्रकाराला विशिष्ठ असे खास महत्व मराठी व्याकरण मध्ये आहे हे आपण आयोगाच्या प्रश्नांना तोंड देताना ह्या बाबी लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे आणि आपल्या सर्वाना ठाऊक आहे कि मराठी व्याकरणात संधी, समास, उपसर्ग, प्रत्यय ह्या गोष्टीना विशेष महत्त्व आहे म्हणून ह्या गोष्टी आयोगाला अपेक्षित आहेत. भाषेचे सौदर्य वाढवण्यासाठी अलंकार, म्हणी, वाक्याप्रचार आवश्यक आहे तसेच यामुळेच लेखन आणि भाषणात प्रभावीपणा निर्माण होतो. स्पर्धा परीक्षेमध्ये कमीत कमी 100 प्रश्नामधून 25 प्रश्न फक्त मराठी व्याकरणावर असतात म्हणून व्याकरण पक्क असणे आपल्या मायबोली भाषेसाठी आणि आपल्या व्ययक्तिक विकासासाठी सुद्धा अती महत्वाची आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post