आपल्या सर्वाना माहिती आहे खगोलशास्त्र हा विषय आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी किती जास्त महत्वाचा आहे आणि आयोग खगोलशास्त्राला किती जास्त महत्व देत आलेला आहे कमीत कमीत 2-3 प्रश्न हे आयोग ह्या विषयावर आपल्याला विचारात असतो आणि 2-3 प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये किती जास्त महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचे असेल तर आपल्याला फक्त सगळेच प्रश्न माहिती असणे आणि डोळ्याखालून जाने अपेक्षित आहे नाहीतर स्पर्धा परीक्षेमध्ये एक एक गुणांसाठी मेरीट जात असते म्हणून ह्या लहान लहान गोष्टी अती महत्वाच्या आहेत. आजच्या खगोलशास्त्र विषयावर MCQ परीक्षा घेत आहेत आणि ह्यामध्ये ज्या प्रश्न आहेत ते आयोगाने विचारले आहेत प्रश्नाच्या बाजूला कोणत्या परीक्षेला कोणता प्रश्न आलेला होता हे प्रश्नाच्या बाजूला लिहिले आहे तर त्या गोष्टी विचारात घेवून आपण तसे महत्व द्यायचे आहे आणि वारंवार येवून उजळणी नक्की करा उजळणी अती महत्वाची आहे.
आपल्याला माहिती आहे खगोलशास्त्र या विषयावर आयोग आपल्याला संकल्पनात्मक प्रश्न विचारत असतो. ग्रह, उपग्रह, तारे, नक्षत्रे, आकाशगंगा, सूर्य, चंद्र व त्यांचे परिभ्रमण-परिक्रमण ह्या गोष्टीला आयोग महत्व देत आहे त्याबरोबरच सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, भरती-ओहोटी, दिवस-रात्र, ऋतूंचे कारण यावर आयोग नेहमी प्रश्न करीत असतो आणि त्याठिकाणी आपले गुण कमी होत असतात म्हणून जे मुख्य विषय आहेत त्या विषयांना आधारून अभ्यास करणे अपेक्षित आहे आणि खाली तुम्हाला MCQ परीक्षा भेटेल त्यावरून तुम्ही एक अंदाज घ्या आयोग कशाप्रकारे प्रश्न करीत आहे.
