नवीन दिवस नवीन घडामोडी. आज आपण 19 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडी ची परीक्षा देणार आहेत. नेहमीप्रमाणे सांगत आलेला कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल आयोग नेहमीच आणि चालू घडामोडी ह्या विषयाला अधिक विशेष महत्व देत आहे कारण हा विषय नेहमी बदलत आहे आणि ह्याचा वाचन करणे प्रत्येक विधार्थ्याला बंधनकारक आहे. इतिहास आणि भूगोल हे विषय न बदलणारे आहेत त्यात जे लिहिलेलं आहे त्याचा विषयावर प्रश्न विचारले जातात मात्र चालू घडामोडी हा नेहमी वाचवा लागणारा विषय आहे आपल्याला वर्तमान पत्र, TV यांच्या माध्यमातून आपल्याला चालू घडामोडीची माहिती मिळते म्हणून आयोग ह्या विषयाला अलीकडे जास्त महत्व देत आहे आणि त्यासाठीच हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे कि तुम्ही ह्या चालू घडामोडी सोडवा रोज येणाऱ्या महत्वाच्या घडामोडी वर मी परीक्षा घेत आहे तर त्याचा चांगला फायदा घेत चला आणि आपल्या मित्रांना देखील नकी सांगा.
आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी नक्षलवादमुक्त घोषित करण्यात आलेलेले राज्य, पाकिस्तानमधील शहरातील विद्यापीठात संकृस्तचा अभ्यासक्रम, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू, दरवर्षी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो, पहिले एआय संचालित सायबर गुन्हे अन्वेषण प्लॅटफॉर्म राज्य, माणिकराव कोकांटे यांचा विभाग, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अलीकडेच सर्वोच नागरी सन्मान, देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड झालेले, राजस्थानमधील दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरील देशातील पहिला 8 पदरी बोगद्याची लांबी, राम सुतार प्रसिद्ध शिल्पकार यांचे निधन इत्यादी महत्वाच्या ठळक बाबी आहेत. ह्यामधील नक्षलवादमुक्त पहिले राज्य आणि प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार याबद्दल विचारण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे म्हणून राम सुतार त्याबरोबेरच नक्षलवादमुक्त राज्य याबद्दल लक्षात नकीच ठेवा. आजचा दिवस चांगला जावो हीच प्रार्थना.
