समाजसुधारक, संत व सामाजिक सुधारणा यावरील प्रश्न आपल्याला खूप दिसणार आहेत स्पर्धा परीक्षामध्ये कारण आपला हा भारतीय समाज प्राचीन काळापासून अंधारात म्हणजेच विविध जाती, परंपरा, अस्पृसता याला मानणार समाज आहे फक्त प्राचीन काळातच नाही तर अजूनही काही प्रथा समाजात आहेत जसे कि जाती आताच्या या आधुनिक समाजात आपल्याला अनुभवायला मिळतात त्यातून होणारा वाद देखील आपण रोज रोज अनुभवतो. ह्याचा सामाजिक विकृतीमुळे समाजात वाद निर्माण झाले भांडणे निर्माण झाली आणि त्यामुळेच समाजसुधारक असतील संत असतील ह्या लोकांनी समाजात आपले मोठे योगदान दिले आहे असा विकृती दूर करण्यासाठी म्हणून आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना ह्या महत्वाच्या बाबी लक्षात घेवून या विषयावर लक्ष केंद्रित करायला हवे.
संत ज्ञानेश्वरांनी, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यासारख्या अनेक संतानी आपले मोलाचे योगदान दिले आहेत. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातील असेल, अभंग असेल असा माध्यमातून ह्या संतानी आपल्या लिहलेल्या ग्रंथामधून किवा प्रचारातून जातीभेदावर, कर्मकांडावर प्रहार केला आणि आताचा संतामुळे समाजात प्रगती घडून आली आपल्या सामान्य माणसापर्यंत प्रगती घडून आली आणि ह्या गोष्टीचा अभ्यास करणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे कारण ह्याच गोष्टी आपल्याला आपल्या समाजाबद्दल माहिती मिळते.
त्याचबरोबर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद असे मोठे मोठे विचारवंतानी आपले मोलाचे मार्गदर्शन दिले आहे जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनी आपल्या ज्ञानातून संविधानामार्फत सगळ्यांना आपले हक्क मिळवून दिले महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा या मार्गातून लोकांना प्रेरित केले तर स्वामी विवेकानंद यांनी युवा वर्गाला आत्मविस्वास आणि त्यांच्यामध्ये असलेला राष्ट्रीयत्वाची भावना जागरूक केली आणि म्हणून सर्व समाजसुधारकांचे अभ्यास करणे आपल्याला महत्वाचे आहे.
आज आपण 20 गुणांची लहान परीक्षा समाजसुधारक, संत व सामाजिक सुधारणा या विषयावर घेत आहे फक्त 5 मिनिटे लागतील परीक्षा द्या आपले काय बरोबर आहे काय चुकीचे आहे बघा आणि त्यानंतर अजून एकदा हि परीक्षा द्या. हे 20 प्रश्न अतीमहत्वाचे आहेत आणि मागील परीक्षेला विचारले गेले आहे. आपला दिवस चांगला सुभ जावो हीच प्रार्थना.
