आपण सर्वाना माहिती आहे महाराष्ट्राची कोणती हि परीक्षा द्या त्यात महाराष्ट्राचा भूगोल अत्यंत महत्वाचा आहे पोलीस भरती पासून विविध मोठ्या परीक्षा प्रत्येक परीक्षेला जाताना आयोग आपल्याला भूगोलावर अनेक लहान मोठे प्रश्न करतो कारण आयोगाला आपल्याकडून अपेक्षा आहे कि जो येणारे अधिकारी आहेत त्यांना भारताचा इतिहास भूगोल माहिती असायला पाहिजे उद्या उठून तुम्ही महाराष्ट्र, भारत चालवणार आहे प्रशासकीय काम आपण करणार आहे म त्यात आपल्याला आपल्या विभागाची माहिती असणे आवश्यक आहे.
आपल्याला भूगोल मध्ये महाराष्ट्राचा विस्तार, त्या भागाची भौगोलिक रचना, आपल्या भागातील पर्वतरांगा महाराष्ट्र, भारतातील आणि परदेशातील महत्वाच्या पर्वतरांगा तसेच जगभरातील नद्या, निसर्गात उपलब्द असलेली साधनसंपती आपल्या सभोवताली असलेले हवामान वातावरण याचा भूगोल मध्ये अभ्यास नेहमी केला जातो आणि आयोगाला ह्या विषयांचे गांभीर्य माहिती आहे आणि म्हणूनच या विषयांचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे ठरत आहे. तसेच भारताचा तसेच महाराष्ट्राचा भूगोल खूप जास्त महत्वाचा आहे. आणि आपला महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितला तर भारतातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला लागलेली वेगवेगळ्या राज्यांची सीमा, समुद्राकिनारे त्याच बरोबर आपला सह्याद्री पर्वतरांगा जो महाराष्ट्राचा महत्वाचा भाग आहे असा विषयाचा आपल्याला अभ्यास करणे गरजेचे ठरले आहे आणि याबदल आपल्याला माहिती असणे खूप जास्त महत्वाचे ठरत आहे आणि आयोगाला हे सगळं अपेक्षित आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचं असेल तर भूगोल व्यतिरिक्त सगळ्या विषयांना आपल्याला असाच महत्व देणे गरजेचे आहे.
आजच्या महाराष्ट्राच्या भूगालावर असलेले ठळक विषय पुढीलप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जलसिंचनाखाली, कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी, शिवाजी विद्यापीठाची स्थापना, 2011 च्या आकडेवाडीनुसार दर बालकामध्ये मुलींचे प्रमाण, 2001-2011 ह्या दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा, महाराष्ट्रातील सर्वात उंच दुसऱ्या क्रमांकाचे पर्वत शिखर, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण तालुके, बिंदुसरा धरण, पहिल्या महिला महाराष्ट्र केशरी, खनिज संपतीचा विचार करता महाराष्ट्रातील विभाग सर्वाधिक यांसारखे महत्वाच्या विषयावर प्रश्न आज आपल्याला यामध्ये भेटणार आहे म्हणून यावर वाचन कारण आणि हि परीक्षा चांगली द्या आणि आपली उत्तरे तपासून पहा आणि त्याचं चांगला वारंवार वाचन करा म्हणजे आयोगाच्या प्रश्नांना आपल्याला मजबुतीने सामोरे जाता येयील. आजचा दिवस अभ्यासात चांगला जावो हीच प्रार्थना.
